आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लाॅकडाऊन आणि अनलॉकच्याही काळात सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. राज्यात तब्बल आठ महिन्यांनी प्रथमच सोमवारपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या. राज्यातील २५ हजारांहून जास्त शाळांपैकी सोमवारी फक्त ३५ टक्केच शाळा उघडल्या. विद्यार्थ्यांची उपस्थितीही अवघी ५ टक्के इतकीच राहिली. ग्रामीण भागातच बहुतांश शाळा उघडल्या होत्या. विद्यार्थी व शिक्षकांना प्रवेश देताना कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांच्या अत्यल्प उपस्थितीने नागरिकांत आजही धास्ती असल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रातील चित्र :
राज्यात एकूण २५ हजार ८६६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालये आहेत. त्यात ५९ लाख २७ हजार ४५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, यापैकी केवळ ३६ टक्के शाळा साेमवारी उघडल्या गेल्या. २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
मराठवाड्यातील स्थिती
मराठवाड्यात विद्यार्थ्यांची अत्यल्प हजेरी होती. उस्मानाबाद जिल्ह्यात ११,७३३ विद्यार्थी हजर होते. जालन्यात ५३६ शाळांपैकी ४०९, बीडमध्ये ७६८ पैकी २३६ शाळा व ७८ हजार विद्यार्थ्यांपैकी अडीच हजार विद्यार्थी शाळेत आले
.
येथील शाळा बंदच
मुंबई, नाशिक, नांदेड, परभणी, जळगाव, हिंगाेली, ठाणे, पालघर, धुळे, नागपूर ,हिंगोली या जिल्ह्यांतील शाळा बंदच ठेवल्या आहेत
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.