आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा: “भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षातही ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही दरी वाढत आहे. अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागतो. पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे भारत शंभरीकडे वाटचाल करताना जात-धर्म विरहित संतुलित, सुरक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत समाज घडावा. ज्ञान, बुद्धी, विचार, स्वास्थ्य, मूल्य याचे संवर्धन व्हावे,” असे प्रतिपादन जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. समाज, देशासाठी अभिमानास्पद व्यक्तींचा सन्मान करून चोरडिया दाम्पत्य विद्यार्थ्यांसह समाजाला प्रेरणा देत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर बोलत होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, अक्षरधाम परिवाराचे ज्ञानवत्सल स्वामी महाराज, अनुप जलोटा, मुरलीकांत पेठकर, अभिनेते रझा मुराद, ‘सुर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, स्नेहल नवलखा, किमया गांधी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.