आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काडतुसे सापडली:भंगार व्यावसायिकाकडे सापडली 1105 काडतुसे, 56 नग जिवंत काडतुसे, 69 खराब काडतुसे

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पुणे शहरात घेण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या युनिट एकने पर्वती येथील जनता वसाहतमधील एका भंगार व्यावसायिकाकडून १ हजार १०५ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये ५६ नग जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे, ९७० बुलेट असून त्यांची किंमत सुमारे १ लाख ५७ हजार रुपये आहे. याप्रकरणी दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज (३४, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, पुणे, मूळ रा. मंगलपूर, ता. कुडा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...