आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तो दिवस होता 49 वर्षांपूर्वीचा...:पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयी आनंदाचा क्षण झाला ‘शिल्पबद्ध’

जयश्री बोकील| पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महू येथील लष्कराच्या संग्रहालयात ‘शिल्पबद्ध’ स्वरूपात साकारणार ऐतिहासिक विजयी आनंदाचा क्षण

तो दिवस होता ४९ वर्षांपूर्वीचा...१६ डिसेंबर १९७१...भारतीय सेनेने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंद सगळीकडे पसरला होता. त्याच विजयी वातावरणात पराभूत शत्रूचे सेनाधिकारी शरणागती स्वीकारण्याचा ऐतिहासिक क्षण सेनेच्या पूर्व विभागाने अनुभवला. तोच शत्रू शरणागतीचा क्षण आता महू येथील लष्कराच्या संग्रहालयात ‘शिल्पबद्ध’ स्वरूपात चिरस्थायी होणार आहे आणि हे ऐतिहासिक शिल्प घडवण्याचा मान पुणेकर शिल्पकार अभिजित धोंडफळे यांना मिळाला आहे. ‘देशाच्या अभिमानाचा प्रसंग शिल्पांकित करणे हा भाग्ययोग वाटतो,’ अशी भावना शिल्पकार अभिजित यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. हे ऐतिहासिक शिल्प नुकतेच लष्कराच्या महू येथील संग्रहालयात पाठवण्यात आले असून या आठवड्यात त्याचे इन्स्टॉलेशन पूर्ण होईल,’ असेही अभिजित यांनी सांगितले.

लष्करी अधिकारी आणि काही प्रसंग यांच्या कामाचा प्रारंभ आपले माजी सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या अर्धपुतळ्यापासून झाली. राष्ट्रीय स्मारकासाठी मला जनरल वैद्य यांचा अर्धपुतळा घडवण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांचे अनेक पुतळे, म्यूरल्स घडवण्याचे योग आले, असे सांगून शिल्पकार अभिजित म्हणाले, ‘आधीचे काम पाहूनच महू येथील संग्रहालयासाठी हे ऐतिहासिक शिल्प घडवण्याची संधी मिळाली. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सेनेसमोर सपशेल शरणागती स्वीकारली, तो क्षण टिपणारे छायाचित्र मला उपलब्ध करून देण्यात आले. त्यावरून प्रथम क्ले मॉडेल बनवले. त्यात योग्य ते बदल, सुधारणा, बारकावे करून मोल्ड टाकला आणि फायबर ग्लासमध्ये हे शिल्प दोन भागांत घडवले. प्रत्यक्ष शरणागतीचा क्षण शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतानाचा आहे. मूळ छायाचित्राचे दोन भाग करून शिल्प घडवले आहे.

या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडला प्रसंग

शरणागतीच्या स्वाक्षरीचा प्रसंग तीन व्यक्तींच्या उपस्थितीत घडला. भारतीय सेनेचे तत्कालीन पूर्व आघाडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा, पराभूत पाकिस्तानी सेनेचे पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. ए. के. नियाझी आणि एक कायदेतज्ञ अशा तीन व्यक्तींचे शिल्प आसनस्थ स्वरूपाचे, पूर्णाकृती (सहा फूट) आहे. मागील बाजूस नऊ व्यक्ती उभ्या आहेत, त्यांची शिल्पे लाइफ साइज प्रकारची आहेत. सुमारे सहा महिने हे काम सुरू होते. ब्लॅक ग्रे शेडिंग करून शेवटी पॉलियुरिथीन कोटिंग केले आहे, असे अभिजित म्हणाले.