आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवले पूल अपघात प्रकरणातील ट्रकचालकाला अटक:चाकण परिसरातून घेतले ताब्यात; वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला होता अपघात

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील मुंबई बेंगलोर महामार्गावर नवले ब्रिज परिसरात एका ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमारे 48 वाहनांना धडक दिली होती. मात्र ट्रकचालक हा फरार झाला होता. तसेच फरार ट्रकचालकाला पोलिसांनी चाकण परिसरातून ताब्यात घेतले आहे. मनीराम छोटेलाल यादव( रा. मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

काय आहे घटना?

20 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक मनीराम यादव हा अशोक लेलँड ट्रक क्रमांक (02 टी ई 5858) हा घेऊन सातारहून मुंबईच्या दिशेला चालला होता. नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर त्याने उतारावर गाडी न्यूट्रल केली होती. त्यामुळे तीव्र उतारावर गाडीचा स्पीड वाढल्याने त्याला गाडीचा वेग नियंत्रित करता आला नाही आणि त्याने 500 फुटापर्यंतच्या वाहनांना बेदारकरपणे धडक दिली . या अपघातात एकूण 48 वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच 20 जण जखमी झाल्याची घटना घडली.

अपघातात 20 जण जखमी

दरम्यान झालेल्या घटनेनंतर, ट्रकचालक मनीराम यादव हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावर सोडून पसार झाला होता.पोलिस त्याचा शोध घेत होते मात्र, तो मिळून येत नव्हता. अखेर पोलिसांनी त्यांच्या कौशल्याचा वापर करत ट्रकचालका संदर्भात माहिती काढून तो चाकण परिसरात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पोलिसांचे पथक चाकण मध्ये जाऊन त्यांनी आरोपीस सोमवारी रात्री अटक केली आहे. आरोपीने बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहनांना धडक देऊन तसेच त्यातील प्रवाशांना जखमी करून, कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता तसेच अपघाताबाबत पोलिसांना माहिती न देता अपघात स्थळावरून पळून गेल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी सकाळी स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल या दरम्यानचे सर्विस रस्ता आणि महामार्ग लगतचे अनधिकृत बांधकामे काढण्याची कारवाई नॅशनल हायवे अथॉरिटीने हाती घेतली. याकामी पोलिसांनी मोठा बंदोबस्त सदर भागात तैनात केला. एक सहाय्यक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक ,16 अधिकारी आणि 130 कर्मचारी असा तगडा बंदोबस्त पोलिसांनी यावेळी लावला. सर्विस रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरणाचे काम यावेळी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...