आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

’ चर्चासत्र:‘आर्किटेक्चरमध्ये महिलांचे योगदान पुरुषांच्या दृष्टिकोनातून’ चर्चासत्र संपन्न

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज (विकी) या राष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने लोहेगाव, पुण्यातील डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर यांनी आयोजित केलेले ‘आर्किटेक्चरमध्ये महिलांचे योगदान पुरुषांच्या दृष्टिकोनातून’ हे एकदिवसीय चर्चासत्र १० नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडले.

या कार्यक्रमात पुणे येथील नामांकित आर्किटेक्चर अश्विन लवेकर, नाशिक येथील प्रसिद्ध आर्किटेक्चर आशिष रणदिवे व आर्किटेक्चर वीणा शेणवी प्रोफेसर डिझाइन चेअर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, लोहेगाव पुणे आदी मान्यवरांनी या विषयावरील आपले विचार मांडले. प्राचार्य शुभदा चापेकर यांनी मान्यवरांकडून अनेक प्रश्नांची उकल केली. या कार्यक्रमासाठी पुणे आणि नाशिक येथील पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गाने हजेरी लावली. कार्यक्रमाची प्रस्तावना विकीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आर्किटेक्ट प्राजक्ता इटरौतवार यांनी केली. विकी राज्य शाखेच्या अध्यक्षा अपर्णा म्हेत्रस यांनी आभार प्रदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...