आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारे यांच्‍या सवालामुळे:सेनेच्या अंधारे, राष्ट्रवादीच्या चाकणकरमध्ये वादाची चिन्हे

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील यांनी सर्व महिलांची माफी मागावी. रूपाली चाकणकरांना यांना मी २ वेळा फोन केला, पण त्यांनी तो उचलला नाही. सत्तार यांना आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाबराव पाटील यांना का बजावत नाही, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत विचारला आहे. आता महाविकास आघाडीतील या दोन महिला नेत्यांमध्ये वाद होण्याची चिन्ह दिसत आहे. सुषमा अंधारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत महिलांविरोधात अपशब्द काढणाऱ्या सर्व नेतेमंडळींवर तोफ डागली. तसेच त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री यांच्यावर राज्याचा, ६ जिल्ह्यांचा कामाचा ताण वाढल्याने त्यांना गृहमंत्रिपद झेपत नाही. फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून महिलांबद्दल बेताल वक्तव्ये केली जात आहेत, अपमान केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक चकार शब्ददेखील बोलले नाहीत

बातम्या आणखी आहेत...