आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोशल मीडियावर महिलांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 275 पुरुषांना लाखो रुपयांना गंडवले

पुणेएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा ब्लॅकमेलिंगसाठी वाढता वापर, लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

सोशल मीडियावर बनावट महिलेचा फोटाे लावत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पुण्यातील २७५ पुरुषांना धमकी देऊन पैसे उकळण्यात अाल्याच्या प्रकारांत वाढ झालेली अाहे. हे सत्र जानेवारीपासून सुरू झाले असून अद्याप ते थांबलेले नाही. अातापर्यंत पाेलिस तपासात असे निदर्शनास अाले की, अाराेपी विविध प्रकारचे सॉफ्टवेअर वापरून खंडणीचे गुन्हे अाॅनलाइन पद्धतीने करत अाहेत.

मुंढवा परिसरातील ३२ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत सायबर पाेलिसांकडे एफअायअार दाखल केला अाहे. व्यावसायिकाकडून अज्ञात अाराेपींनी १८ हजार रुपयांची खंडणी वसूल केली. सायबर पाेलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अाराेपी फेसबुक, व्हाॅट‌्सअप, स्क्रीन व्हिडिओ रेकॉर्डर साॅफ्टवेअर, हाऊस माॅड्युलेटर सॉफ्टवेअर अाणि वेगवेगळया यूपीअाय अॅप्लिकेशनचा गैरवापर करताना दिसून येत अाहेत.

अाराेपी हे पुरुष असतानाही ते सोशल मीडियावर महिलांचे रूप धारण करून खाेटे प्राेफाइल तयार करतात. एखाद्या महिलेचे वेगवेगळे मादक फाेटाे अपलाेड करतात. त्यानंतर विविध शहरांतील पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते. अनेक जण फाेटाे पाहून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. त्यानंतर दाेघांत चॅटिंग सुरू हाेते व एकमेकांच्या मोबाइल नंबरची देवाणघेवाण होते. या वेळी हाऊस माॅड्युलेटर साॅफ्टवेअरचा वापर अाराेपी करून पुरुषांचा अावाज महिलेच्या अावाजात रूपांतरित करून समाेरच्या व्यक्तीला एेकवतात.

संबंधित अाराेपी पीडित पुरुषांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर एके दिवशी अचानक रात्री महिला पुरुषास लाइव्ह अथवा रेकाॅर्डिंग ‘न्यूड व्हिडिअाे’ पाठवण्याचे सांगते. स्क्रीनवर संबंधित व्हिडिओ पाठवल्यानंतर ‘ती महिला’ पुरुषास त्याचा न्यूड व्हिडिओ काढण्यास सांगते. दरम्यान, पुणे सायबर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित म्हणाले, सोशल मीडियावर अालेली अनाेळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अज्ञातांसाेबत स्वत:चा फाेन नंबर शेअर करू नये. स्वत:चे फाेटाे, व्हिडिओ कुणीही शेअर करू नये.

आरोपींचे धागेदारे राजस्थानमध्ये केंद्रित
एकदा का महिलेकडे पीडित पुरुषाचा न्यूड व्हिडिओ गेला की, पैसे मागण्यासाठी खंडणीचे फाेन सुरू हाेतात. अब्रू वाचवण्यासाठी अनेक जण पैसेही देतात. अशा प्रकारे केवळ पुण्यातच २७५ पुरुषांनी १५ हजार ते ५५ हजार इतकी रक्कम अाराेपींच्या यूपीअाय अॅप्लिकेशनवर पाठवलेली अाहे. पाेलिस तपासादरम्यान या गुन्ह्याचे धागेदाेरे राजस्थानमध्ये केंद्रित झाले अाहेत. राजस्थान पाेलिसांनी दाेन पुरुषांना याप्रकरणी अटक केली असून त्यांनी राजस्थान व देशातील इतर राज्यांत अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात गुन्हे करून खंडणी उकळल्याचे दिसून अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...