आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:पुण्यात वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपविले. याआधी पुण्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या सैन्यातील महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. चव्हाण यांच्या आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी घटनास्थळाची कसून झडती घेतली, असून आत्महत्येच्या मुख्य कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शिल्पा चव्हाण या कर्तबगार पोलीस अधिकारी असल्याची देखील माहिती खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

मृत शिल्पा यांनी विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...