आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह म्हणाले:‘ग्लोबल दुष्परिणामांवर लोकल उपाय व्हावेत’

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तेर पॉलिसी सेंटर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली  एक दिवसाची लोक अदालत भरवण्‍यात आली. - Divya Marathi
‘तेर पॉलिसी सेंटर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसाची लोक अदालत भरवण्‍यात आली.

हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी सेंटर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेल्या एक दिवसाच्या लोक अदालतला मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला. या सत्रात डॉ. राजेंद्रसिंह, डॉ. सुनील मुरलीधर शास्त्री, सारंग यादवडकर, माजी कुलगुरू नितीन करमळकर, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर, युक्रेन विद्यापीठाच्या प्रा. इरिना उपस्थित होते.

डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, हवामान बदलाच्या ग्लोबल दुष्परिणामांवर ‘लोकल ‘उपाय व्हावेत. पूर्वी बिहार, बंगाल, ओडिशा येथेच पूर येत होते. आता ११ राज्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते. नैसर्गिक संपदेचे केंद्रीकरण करण्याच्या हव्यासाने हवामान बदल घडून येत आहेत. अभयारण्ये एका बाजूला आणि खाणी त्यांच्या शेजारी उभ्या राहणे, चिंताजनक आहे. हवामान बदलाच्या दुष्परिणाम जागतिक पातळीवर असले तरी उपाय स्थानिक पातळीवर करता येण्यासारखे आहेत.

बातम्या आणखी आहेत...