आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:पुणे रेल्वेस्थानकात संशयास्पद वस्तू सापडल्याने एकच खळबळ

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ जनरल अारक्षण खिडकीसमोरील मोकळ्या जागेत प्लॅटफाॅर्मवर प्रवेश करण्याच्या ठिकाणी तीन जिलेटिनच्या कांड्यांसारख्या दिसणाऱ्या संशयास्पद वस्तू शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिसून अाल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे पाेलिस व पुणे पाेलिसांनी बाॅम्बशाेधक व नाशक पथकास संबंधित संशयास्पद वस्तूची मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने पाहणी करत ते पार्सल बी.जे. मेडिकल मैदानावर नेऊन त्याचा स्फाेट घडवला. त्यात फटाके असल्याचे निष्पन्न झाले अाहे.

दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेस्थानकावरील प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाॅम्बशाेधक व नाशक पथक, लाेहमार्ग पुणे व पुणे शहर, अग्निशामक, रुग्णवाहिका तसेच सर्व संबंधित विभाग घटनास्थळी दाखल झाले. संशयित वस्तूची तपासणी केली असता, त्यात काेणत्याही प्रकारचा स्फाेटक पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले. त्यात जिलेटिन कांड्या नव्हत्या व त्यांना काेणताही पाॅवर साेर्स जाेडलेला नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास अाले. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही.

घटनेची तपासणी करणार
पुणे लाेहमार्ग विभागाचे पाेलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील म्हणाले, पुणे रेल्वेस्टेशन व परिसराच्या अधिक सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून बाॅम्बशाेधक व नाशक पथक व श्वान पथक यांच्याकडून तपासणी करण्यात अालेली अाहे. संशयित तीन नळकांड्यांत माेठाया फटाक्यांची लेबल काढून त्यात फटक्याची स्फाेटके ठेवण्यात अाली हाेती. नेमका हा प्रकार काेणी केला व त्याचा उद्देश काय हाेता, याबाबत सखाेल तपासणी करण्यात येत अाहे. जनतेने काेणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

बातम्या आणखी आहेत...