आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरमला भीषण आग:'वेल्डिंगच्या कामामुळे आग लागल्याची शक्यता'- महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरममध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू

कोरोना आजाराची कोव्हिशील्ड व्हॅक्सीन तयार करत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अडीच ते तीन तासानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळाले. दरम्यान 'ही आग इमारतीत सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामादरम्यान लागली असावी,' असा अंदाज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 'सीरम इंस्टीट्युटला लागलेली आग भीषण होती. या आगीत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तिथे विजेचे आणि वेल्डिंगचे काम सुरू होते, त्यादरम्यान ही आग लागली असावी.'

कोरोनाची लस सुरक्षित

मोहोळ पुढे म्हणाले की, 'सर्व लसी तळमजल्यावर ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे लसींचे काही नुकसान झाले नाही. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, वित्तहानी किती झाली आहे, याबाबत अद्याप काहिही सांगता येणार नाही.'

बातम्या आणखी आहेत...