आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हॅक्सीन अपडेट:डीसीजीआयकडून नोटीस मिळाल्यानंतर सीरम इंस्टीट्यूटने थांबवली कोरोना व्हॅक्सीनची चाचणी

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरसची लस तयार करण्याचे काम अनेक देशांमध्ये सुरू आहे. भारतातही लस तयार करण्याचे काम सीरम इंस्टिट्यूट करत आहे. परंतू, आता पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट डीसीजीआयने(ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) नोटीस बजावली आहे. कोविड लसीची चाचणी बंद का केली नाही याविषयी स्पष्टीकरण मागत डीसीजीआयने सीरमला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ऑक्सफर्ड आणि लंडनची फार्मा कंपनी एस्ट्राजेनेका लस तयार करण्याचे काम करत आहे. लसीच्या पहिल्या दोन चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या. पण, तिसऱ्या टप्प्यात रुग्णांना दिलेल्या लसीचे साईड इफेक्ट्स जाणवल्यानंतर ऑक्सफर्डने चाचणी थांबवली. यानंतर, सीरम इंस्टिट्यूटने म्हटले की ब्रिटनने आपल्या चाचण्या थांबवल्या आहेत पण भारतातील प्रक्रिया सुरूच राहतील. सीरम इंस्टिट्यूटच्या या प्रतिक्रियेनंतर डीसीजीआयने सीरमला नोटीस बजावली आहे.

याबाबत सीरम इंस्टिट्यूटने म्हटले की, "आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत आणि एस्ट्राजेनेकाचे ट्रायल सुरू करेपर्यंत आम्ही भारतातील ट्रायल थांबवत आहोत. आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन करत आहोत.'

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटने कोरोनावर लस निर्मितीचे काम सुरू केले आहे. या लस निर्मितीच्या कामात सीरम इन्स्टिट्यूट अॅस्ट्रोजेनकासोबत मिळून या लसीचे १०० मिलियन डोस तयार करणार आहे. भारतात ही लस 'कोविशील्ड' नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस उत्पादक कंपनी लॉन्च करणार आहे.