आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरम कंपनीचे 1 कोटींचे फसवणूक प्रकरण:चार राज्यातून सात आरोपींना अटक, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीरम कंपनीचे मालक अदर पूनावाला यांच्या नावे मेसेज पाठवून कंपनीची एक कोटीची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चार राज्यातून सात आरोपींना अटक केली आहे. मात्र यामागील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. सात जणांची बॅंक खाती व्यवहारासाठी वापरण्यात आली होती. त्यांच्याकडील आठ खात्यांत आलेले पैसे इतर 40 बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

राजीव कुमार शिवाजी प्रसाद(रा. बिहार), चंद्रभुषण आनंद सिंग (रा. बिहार), कन्हेैयाकुमार संभु महंतो ( बिहार), रविंद्रकुमार हुबनाथ पटेल( उत्तरप्रदेश), राबी कौशलप्रसाद गुप्ता (मध्यप्रदेश), यासीर नाझीम खान( 27,रा. मध्यप्रदेश ) आणि प्रसाद सत्यनारायण लोबुडू ( रा. आंध्रप्रदेश ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सीरमचे संचालक सतिश देशपांडे यांच्या मोबाइलवर मुख्य आरोपीने मेसेज करून तो सीईओ अदर पूनावाला असल्याचे भासवले होते. मेसेजमध्ये मी मिटींगमध्ये व्यस्त आहे, मला फोन करु नका, मी पाठवलेल्या एकूण आठ बॅंक खात्यावर तात्काळ रकमा पाठवा असे लिहले होते. देशपांडे यांनी तात्काळ संबंधीत बॅंक खात्यावर 1 कोटी 1 लाख रुपये पाठवले. दोन दिवसांनी त्यांचे अदर पूनावाला यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेव्हा त्यांनी अशा प्रकारे कोणताच मेसेज केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सिरमच्या फायनांन्स मॅनेजरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बँक खात्यांची काढली माहिती

पोलिसांनी तपास करुन सीरम कंपनीचे पैसे वर्ग झालेल्या बॅंक खात्यांची माहिती काढली. ही खाती असलेल्या बिहार, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि उत्तरप्रदेशातील सातही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुख्य आरोपीला त्यांची बॅंक खाती कमिशनच्या बदल्यात वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपीने त्यांच्या आठ बॅंक खात्यातील पैसे इतर चाळीस बॅंक खात्यात वर्ग केले आहेत. यातील प्रसाद लोबुडू हा संगणक अभियंता आहे तर राबी गुप्ता हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. दोघेही एका मोठ्या खासगी बॅंकेत कामाला आहेत. तर यासीन खानचे शिक्षण बीटेक पर्यंत झाले आहे.

यांची कामगिरी

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता ,सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपयुक्त समर्तना पाटील , एसीपी ए. एन.राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते ,पोलिस उपनिरीक्षक नळकांडे ,पोलीस उपनिरीक्षक गावडे ,पोलिस अंमलदार राजाराम घोगरे ,अशोक हेगडे ,रामदास घावटे ,रवींद्र जावळे ,अमोल सरडे, अनिल कुसाळकर ,करण तळेकर, सागर घोरपडे, मनोज भोकरे, सुधीर घोटकुले, संजय वनवे , ज्ञाना बडे, शिवाजी सरक यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...