आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापण्यातील फुरसुंगी रोड येथील एका लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकत पोलिसांनी दोन पीडित मुलींची वेश्यावसायातून सुटका केली, अशी माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांना गोपनिय माहिती मिळाली की, रॉयल लॉजिंग देविका प्लाजा बिल्डीग, हरपळे पार्क, फुरसुंगी रोड, पुणे येथ वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवुन वेश्या व्यवसाय चालत आहे.
त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, नमुद लॉज मध्ये वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून, सदर ठिकाणावरून दोन पिडीत मुलींची वेश्यावसायातून सुटका करण्यात आली आहे.
यानंतर पोलिसांनी लॉजचालक, व्यवस्थापकासह एकूण तीनजणांविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. ३७०, (३४) सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंदवला. त्यानंतर घेतलेल्या संशयितांना हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, रेश्मा कंक, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार या पथकाने केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.