आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 14 वर्षीय मुलगी गर्भवती केल्याने तरुणावर गुन्हा दाखल करून अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन 14 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे शारिरीक संबंधातून मुलगी गर्भवती राहिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी तरुण विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी जोयल जॉनी फ्रॅंक (वय -21, रा. लक्ष्मीबाई गार्डन जवळ, खडकी,पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या 37 वर्षीय आईने आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलीला जोयल याने "मी तुझ्यावर प्रेम करतो, मला तू खूप आवडते, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे" असे म्हणून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. ती अल्पवयीन आहे, हे माहिती असताना देखील त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला मित्राच्या घरी घेऊन जात तिच्यासोबत इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे.

सिगारेटची उधारी मागितल्यामुळे तरुणावर कोयत्याने वार

सिगारेटची उधारी मागितल्याचा राग आल्यामुळे अल्पवयीन हल्लेखोर मुलांनी टपरी चालकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मुंढव्यातील केशवनगरमध्ये घडली आहे.अल्पवयीन मुलांनी तरुणावर वार केल्याने सदर परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सिताराम साठे (वय- 21, रा. मांजरी,पुणे) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर, दोघे आरोपी पसार झाले आहेत. सिताराम साठे याची केशवनगरमधील लोणकर चौकात पान टपरी आहे.

त्याठिकाणी अल्पवयीन आरोपी सतत सिगारेट घेण्यासाठी येत होता. तो उधारीवर सिगारेट घेत होता. घटनेच्या दिवशी देखील तो सिगारेट पिण्यास आला होता. पण, सितारामने उधारीचे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीररित्या जखमी केले आहे. याबाबत पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहे.