आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकृतीला कळस गाठणारी घटना:माथेफिरूकडून गोठ्यातील गाईवर लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली कोठडी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात बुधवारी विकृतीचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका माथेफिरूने एका गोठ्यातील गाईवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने लोणावळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी दिपक शिवाजी राजवडे (वय 22, रा. कुसगाव, साठेवस्ती, ता. मावळ,पुणे) या विकृतावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी सतिश दगडू काकरे (वय 26) याने तक्रार दिली आहे. या घटनेचे वृत्त असे की, कोकरे यांची शेती आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे जरशी गायी आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि 31) रात्री कोकरे यांनी गोठ्यातील गायींना चारा दिला. यानंतर ते घरात जाऊन झोपी गेले.

दरम्यान, शिवाजी राजवडे हा रात्रीच्या सुमारास कोकरे यांच्या गायींच्या गोठ्यात शिरला. यावेळी त्याने कोकरे यांच्या 10 वर्षांच्या टीकली नामक एका गायीवर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान गोठ्यातून गायीचा आवाज येऊ लागल्याने कोकरे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता, राजवडे हा गायीवर अनैसर्गिक कृत्य करत असताना आढळला. कोकरे यांना पाहताच राजवडे पळला. थोड्या वेळानंतर राजवडे हा पुन्हा आला. यावेळी कोकरे कुटुंबीय तेथेच होते. कोकरे यांनी राजवडेला तू गोठ्यात काय करत होतास असे विचारले, तेव्हा मी काहीच केले नाही असे म्हणत राजवडे हा कोकरे कुटुंबीयांशी हुज्जत घालू लागला. एवढेच नाही तर त्याने त्यांच्याशी झटापटही केली. यानंतर पुन्हा राजवडे हा पळून गेला. त्यानंतर कोकरे कुटुंबीयांनी लोणावळा पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी दिपक राजवडे याला अटक केली आहे. त्याला कोर्टापूढे हजर केले असता कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान सतिश कोकरे यांनी गायींच्या आरोग्याची उत्तरीय तपासणी करावी अशी मागणी केली तसेस राजवडे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पुढील तपास एपीआय सतिश माने करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...