आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील धक्कादायक घटना!:शाळकरी मुलाचा लैगिंक छळ, माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन शाळकरी मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वानवडी येथील एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या विराेधात कारवाई न केल्या प्रकरणी पुणे आणि मुंबईतील दोन धर्मगुरुंच्या विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारूती साहेबराव भापकर (वय 52, रा. चिंचवड, पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी या प्रकाराची तक्रार केली होती.

खोलीत नेले अन्

संबंधित मुख्याध्यापक मुलाच्या आई-वडिलांच्या ओळखीचे आहेत. मुख्याध्यापक मुलाच्या घरी गेले होते. त्यावेळी मुलाचे आई-वडील घरी होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मुख्याध्यापक मुलाच्या खोलीत गेले आणि अश्लील कृत्य केले. मुलाने या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर जाब विचारण्यासाठी मुलाचे आई-वडील मुख्याध्यापकाकडे गेले होते.

अत्याचाराचा गुन्हा दाखल

मी कोणाला घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापकाची पुणे आणि मुंबईतील धर्मगुरुंकडेव तक्रार करण्यात आली. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. माजी मुख्याध्यापकावर यापूर्वी देखील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील ढमरे करीत आहेत.

1.75 लाखांचे इंजेक्शन जप्त

शरीरसौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा विक्री केल्या प्रकरणी गुन्हे शाखा आणि अन्न आणि ओैषध प्रशासनाने (एफडीए) एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शंकरशेठ रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पावणेदोन लाख रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली.

इंजेक्शनची बेकायदा विक्री

याप्रकरणी अमृत पंडीत चौधरी (वय 30, रा. मुंढवा,पुणे) याच्या विराेधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एफडीएच्या औषध निरीक्षक शामल महिंद्रकर यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरीरसौष्ठवपटू डाॅक्टरांच्या सल्ल्याने या इंजेक्शनचा वापर करतात. चौधरी या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली.

आदींवर कारवाई

पोलिसांनी सापळा लावून चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 70 हजार 305 रुपयांची इंजेक्शन जप्त करण्यात आली. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, नामदेव रेणुसे, मोकाशी, पवार, राजपुरे, ताम्हाणे, शेख, जाधव, नागनाथ राख आदींनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...