आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  •  Shambhuraj Desai, Dilip Valse Patil At Ganesh Mandir| Darshan Of Dagdusheth Halwai | Prayed For Economic Prosperity In The Maharashtra

शंभूराज देसाई, वळसे पाटील गणरायाच्या चरणी:सहकुटुंब घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे दर्शन, राज्यात आर्थिक सुबत्तेसाठी प्रार्थना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी हे सरकार आल्यानंतर आणि कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर उत्साहामध्ये आपण गणेशोत्सव संपूर्ण राज्यांमध्ये साजरा करतोय. प्रथेप्रमाणे मी आज माझ्या कुटुंबीयासह अभिषेकाला, आरतीला या ठिकाणी आलो अशी भावना मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केली.

देसाई पुढे म्हणाले, दरवर्षी प्रमाणे मी गणेशोत्सवामध्ये एक दिवस अभिषेकाला आणि आरतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाच्या चरणी येत असतो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे सर्व उत्सव बंद होते. परंतु तरीसुद्धा गणेशोत्सवात मंदिराच्या बाहेरून गणराया दगडूशेठच दर्शन घेऊन जात होतो.

चांगल्या उपाययोजना करु

ते म्हणाले, गणरायाच्या चरणी मी प्रार्थना केली आहे की गणरायाच्या आशीर्वादाने कोरोनाचे संकट दूर झालेले आहे. परंतु दोन वर्षाच्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य आर्थिक संकटामध्ये सापडले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी चांगल्या उपाययोजना करतोय.

गणरायाच्या चरणी प्रार्थना

आर्थिक सुबत्ता महाराष्ट्र राज्याला प्राप्त व्हावी देशातलं विकासाच्या बाबतीत आर्थिक सबळ असणारे पहिल्या क्रमांकाचे राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र व्हावे हीच प्रार्थना श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या चरणी केलेली आहे.

दिलीप वळसे पाटलांनी घेतले दर्शन

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतले दर्शन. यावेळी वळसे पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मनोभावे प्रार्थना करण्यासाठी मी येत असतो, माझे कुटुंबीय येत असतात. यादेखील वर्षी गणरायाचे दर्शन झाले.

शांतता नांदू दे

पुढे वळसे पाटील म्हणाले, गेल्या 2 वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर यावर्षी पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशातून जनता या ठिकाणी येते. योगायोगाने यंदा पाऊस चांगला असल्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा आनंदी आहे. आणि म्हणून गणरायाकडे एवढीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी, समाधानी ठेव. आणि या राज्यांमध्ये शांतता नांदू दे.

बातम्या आणखी आहेत...