आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:गुरू ठाकूर यांना शांता शेळके स्मृती पुरस्कार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी गीतकार, पटकथा - संवादलेखक, नाटककार गुरू ठाकूर यांना यंदाचा शांता शेळके स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिली. त्या म्हणाल्या की साहित्य शारदा ‘शांताबाई शेळके’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता “आठवणीतील शांताबाई” या सांस्कृतिक कार्यक्रमाने करत आहोत. या वर्षीचा ‘शांता शेळके स्मृती पुरस्कार’ मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे हा कार्यक्रम होणार असून तो विनामूल्य आहे.

बातम्या आणखी आहेत...