आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदखेडराजा येथे बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला!:पेपरफुटी प्रकरणी चाैकशी करुन दाेषीवर कारवाई करणार - शरद गाेसावी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे बारावीच्या परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणाची माहिती आमच्याकडे आलेली आहे. याबाबत संबंधित ठिकाणच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण अहवाल बाेर्डाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पेपरफुटी प्रकरणात जे दाेषी आढळतील त्यांच्यावर याेग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बाेर्डाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बाेलताना दिली आहे.

अशी पेपरफूटी पहिलीच

गाेसावी म्हणाले, यावर्षी पेपरफुटीचा अशाप्रकारे पहिलाचा प्रकार समाेर आलेला आहे. पेपरची सुरवात आपण सकाळी अकरा वाजता सर्व ठिकाणी एकाचवेळी करत असताे. दहा मिनिट पेपर सुरु हाेण्यापूर्वी पेपर आधी दिला जात हाेता. परंतु पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या नियाेजित वेळेस पेपर विद्यार्थ्यांना देण्यात येताे. परंतु यासंर्दभात नेमका गैरप्रकार कसा झाला याची सर्व माहिती आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट हाेईल.

पेपर कसा बाहेर आला तपासू

विद्यार्थ्यांना पेपर नंतर दहा मिनिट वाढवून दिलेले असतात, त्यामुळे परीक्षेपूर्वी पेपर कसा बाहेर आला हे तपासले जाणार आहे.

प्रकरणाची चौकशी सुरू

परीक्षा केंद्रावर सुरक्षित कस्टडी मध्ये पेपर सुरुवातीला ठेवलेला असताे. त्यानंतर ताे परीक्षा केंद्रावर पाठवला जाताे. परीक्षा सुरु हाेताना त्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पेपर गेल्यानंतर फुटला गेला आहे का? याबाबत चाैकशी सुरु आहे. चाैकशी करुन दाेषींवर गुन्हा ही दाखल करण्यात येईल. काेणालाही पाठिशी आम्ही घालणार नाही कारण पेपर सुरक्षित रहावे यासाठी माेठी खबरदारी घेतलेली असते. पेपरचा प्रवास हाेताना जीपीएस लाेकेशनवर ही नजर ठेवण्यात येत असते. त्याचसाेबत जाे असिस्टंट कस्टाेडियन आहे त्याने परीक्षा केंद्र चालकाकडे परीक्षा पेपर देताना व्हिडिओ रेकाॅर्डिंग ही करण्यात येते. ते पाहूनही नेमके पेपर कुठे फुटला याबाबत माहिती मिळू शकणार आहे. काेण संशयित असतील त्यांच्यावर याेग्य ती कारवाई केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...