आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार शनिवारी 80 वर्षांचे झाले आहेत. त्याच्या जन्मदिनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पुण्याच्या भिंतीवर त्यांचे चित्र बनवले आहे. हा फोटो साताऱ्यातील पावसातील सभेतील आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे चित्र पुण्याचे सध्याचे नगरसेवक दीपक मानकर यांनी नानापेठ परिसरातील एका बिल्डिंगच्या भिंतीवर पेटिंगच्या माध्यमातून काढले आहे. त्यांनी म्हटले की, शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याकडून ही छोटीशी भेट आहे.
ऐतिहासिक सभा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा येथील भर पावसातील सभा राज्यातील जनतेला भावली होती. यासभेनंतर विधानसभा निवडणुकीचा डाव पालटला होता. सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाआघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपच्या गर्वाचे घर खाली आले होते. म्हणूनच ही सभा ऐतिहासिक ठरली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.