आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला एक जानेवारी २०२३ रोजी १७५ वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने उद्या दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून संपूर्ण राज्यात जनजागर यात्रा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजीया खान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, आशा मिरगे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातून तत्कालीन समाज सुशिक्षित झाला त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या जागरामुळे बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचारा विरोधात समाज पेटून उठला व समाजातील अनिष्ट रूढी परंपरा संपवण्यात आल्या व एका आदर्श समाजाची निर्मिती फुले दांपत्याकडून त्यावेळी करण्यात आली.
आजच्या काळात गेल्या आठ वर्षापासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारी, अन्याय अत्याचारा विरोधात देखील अशाच प्रकारचा जागर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असून, संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार असून ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर व तालुक्यात जाणार आहे.
गेल्या ९ वर्षात गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल , डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, सर्वसामान्य लोकांच्या खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर आलेली कुऱ्हाड, सुशिक्षित तरुणांवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या इतर राज्यांमध्ये पळविण्याचे सुरू असलेले उद्योग व राज्यातील लोकशाहीला घातक असणाऱ्या घडामोडी घडत राज्य सरकार पाडण्यासाठी केले गेलेली कट कारस्थाने, महिला भगिनींवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्द्यांवरती समाजाचे जागर करण्याचं काम ही जन-जागर यात्रा करणार आहे.
पुणे शहरातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जन -जागर यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असे करत महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.