आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवस विशेष:साहेबांकडून प्रगतीचे गमक जाणणे मोदीजींना महत्त्वाचे वाटले...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सतीश राऊत (शरद पवार यांचे खासगी सचिव)
शरद पवार साहेबांच्या प्रदीर्घ कारकीर्दीकडे वळून पाहिले की, डोळ्यासमोर खूप प्रसंग उभे राहतात. पंतप्रधान मोदींजींच्या २०१५ मधील बारामती दौऱ्याप्रसंगी राजशिष्टाचाराच्या पलीकडे जाऊन दोहोंतील परस्पर आदरभावाची अनेक दृश्ये पाहायला मिळाली. पंतप्रधानांचा एक कार्यक्रम बारामतीतील अप्पासाहेब पवार सभागृहात होता. प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधानांच्या दोन्ही बाजूस राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची आसनव्यवस्था होती. मात्र, पंतप्रधानांची इच्छा साहेब यजमान असल्याने ते शेजारी बसावेत अशी होती. राजशिष्टाचाराचे संकेत मोडून पंतप्रधानाच्या शेजारी साहेबांच्या बसण्याची ऐनवेळी व्यवस्था करण्यात आली. साहेबांकडून प्रगतीचे गमक जाणणे पंतप्रधानांना महत्त्वाचे वाटत होते. सारे सभागृह अचंबित होऊन हा प्रकार पाहत होते.

मोदीजींच्या न्याहरीची व्यवस्था साहेबांच्या घरी ‘गोविंदबागे’मध्ये करण्यात आली होती. सुप्रियाताई आणि वहिनी म्हणजे सौ. पवार त्यांच्या आहार अन् आतिथ्याची काळजी घेत होत्या. स्नेहभोजन संपले तसे पवार कुटुंबीयांबरोबर फोटोसेशन व्हावे अशी इच्छा प्रकट झाली. राजशिष्टाचाराप्रमाणे असे करणे अवघड होते. मात्र, पंतप्रधानांनी तत्काळ हसून संमती दिली. हिरवळीवर तातडीने जवळच्या खुर्च्या मांडण्यात आल्या. त्या सगळ्या प्लास्टिकच्या होत्या. साहेब ज्या खुर्चीवरून कलंडून जखमी झाले होते तशाच खुर्चीवर त्यांना बसावे लागले. फोटोसेशन संपल्यानंतर साहेबांना खुर्चीवरून उठताना जिकिरीचे वाटत होते. मोदीजींनी हात पुढे करून साहेबांना मदत केली. राजशिष्टाचार सोडून गोविंदबागेत जे घडले ते इतरत्र पाहावयास मिळाले नसते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser