आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेनाचा प्रादुर्भाव:पुण्यातील काेराेनाची ढासळती स्थिती सांभाळण्यासाठी शरद पवार मैदानात, काेराेनाच्या विळख्यातून नागरिकांची हाेईना सुटका

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेमकी परिस्थिती, हाेणाऱ्या चुका जाणून घेतल्या

मागील पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात काेराेनाचा माेठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असून मृत्युसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर जम्बाे काेविड रुग्णालयातील असुविधांची मालिका चव्हाट्यावर आली असून प्रशासनाचा हलगर्जीपणा सर्वांसमाेर आला आहे. संबंधित परिस्थिती सुधारण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरत प्रत्यक्ष पुण्यातील काेराेना परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती काेराेना रुग्णांची संख्या पाहता दाेन्ही शहरांत तब्बल ८०० बेडची जम्बाे काेविड रुग्णालये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय साधने, आैषधे यांची कमतरता असण्यासाेबतच समन्वय नसल्याने अनेक रुग्ण दगावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. लाेकांची संबंधित काेविड सेंटरवरील विश्वासार्हता ढासळू लागल्याने पवार यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, विभागीय आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांना समज देत लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्य सरकार मदत करत असताना ही परिस्थिती बिघडत का आहे, कुणाचे नियंत्रण सर्व घडामाेडींवर आहे, बिघडलेल्या गाेष्टीला नेमके काेण जबाबदार आहे, नेमक्या काेणत्या चुका हाेत आहेत, काेणत्या उपाययाेजना करणे आवश्यक आहे आदी बाबींचा विचार झाला पाहिजे, असे सांगितले आहे.

विभागीय आयुक्त साैरभ राव यांच्याशी पवार यांनी चर्चा केली असता रुग्णांना तत्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासन पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे सांगण्यात आले.

नेमकी परिस्थिती, हाेणाऱ्या चुका जाणून घेतल्या
पवार यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन-जुन्या नेत्यांशी बैठक घेत नेमकी परिस्थिती काय आहे आणि कुठे चुका हाेतात, याची माहिती करून घेतली. खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, विराेधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, आमदार चेतन तुपे या वेळी हजर हाेते.