आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा राजीनामा:पुण्यातील राष्ट्रवादी भवन समोर कार्यकर्त्यांना फुटला हुंदका! कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील वडीलधाऱ्याचा अनपेक्षित निर्णय ऐकून सैरभैर झालेले शेकडो कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवना समोर जमा झाले. मुंबईतील घडामोडीवर कार्यकर्ते लक्ष्य ठेवून होते आणि चालू घडामोडी जाणून घेत होते. परंतु पक्ष प्रमुख शरद पवार यांनी काही निर्णय बदलला नाही आणि कार्यकर्त्यांना अक्षरशः हुंदका फुटला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ही माहिती समजली आणि पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवार यांना साकडे घालण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले.

याप्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. पवारसाहेब हे घरातील वडीलधारे कर्ते आहेत. घरातील वडीलधारे कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे साहेब निर्णय बदलत देत नाही तोपर्यंत आम्हीही सर्वजन राजीनाम्यावर ठाम आहोत.

सगळ्याच कार्यकर्त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या होत्या आणि अश्रू आवरत नव्हते. राजीनामा मागे घ्या अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. याप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख , रविंन्द्र माळवदकर , सदानंद शेट्टी , मुणालिनी वाणी , निलेश निकम , काका चव्हाण अजिंक्य पालकर, विक्रम जाधव , फईम शेख , गुरूमितसिंग गिल व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्याने शरद पवार यांना लिहिले रक्ताने पत्र

शरद पवार यांच्या अनपेक्षित निर्णय नंतर एका साहेब समर्थक म्हणून घेणाऱ्याने कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून घेतलेला निर्णय मागे घेण्याची विनवणी केली आहे. पुण्यातल्या संदीप काळे यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहीत भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी संदीप काळे म्हणाले की, शरद पवार हे आमचे दैवत आहेत. जेव्हा पासून मी राजकारणात आहे, मी त्यांना बघूनच काम करत आहे.

वाढदिवशी मोफत रिक्षा चालवतो

गेले 10 वर्ष झाले मी पक्षात काम करत आहे. माझा व्यवसाय रिक्षाचा आहे. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी 12 डिसेंबरला मोफत रिक्षा चालवतो. त्यांच्याविषयी कोणी काही बोललं तर ते मी खपवून घेत नाही. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मंदिरात साकडे घातले होते. आता त्यांनी राजीनामा दिला. परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्याकडे बघून काम करत आहे. ते नसले की आम्ही पोरके होऊन जाणार आहे.