आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन:म्हणाले- मी टीव्हीवर पाहत असतो; काय त्यांची अ‍ॅक्शन, काय त्यांचे नृत्य!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी संसंदेच्या अधिवेशनासाठी जायचे असल्याने इंदुरीकर महाराजांचे किर्तन ऐकू शकत नाही, याची खंत व्यक्त करत आपल्याला त्यांचे किर्तन आवडत असल्याचे सांगितले.

शरद पवार म्हणाले, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये गंमती असतात. मी अनेकदा ते टीव्हीवर पाहत असतो. त्यांची अ‍ॅक्शन काय, त्यांची टाळ, नृत्य सर्वच उत्तम असते. आता सागळ्या गोष्टी सांगत नाही. जनमाणसावर सहजपणे संस्कार कसे करता येतील हे कीर्तनकार इंदुरीकर महाराजांकडून शिकावे.

संसदेच्या अधिवेशनासाठी निघाले

पुढे शरद पवार म्हणाले, निवृत्ती महाराज इंदुरीकर हे महाराष्ट्रात उत्तम काम करत आहेत. यावेळी मला त्यांचे कीर्तन ऐकता येणार नाही. कारण संसदेच्या अधिवेशनासाठी निघायचे आहे. परंतु पुढच्या वेळी त्यांचे किर्तन ऐकल्याशिवाय मी राहणार नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इंदुरीकर महारांजाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. दिल्लीतील अधिवेशनामुळे त्यांना इंदूरीकर महारांजाचे किर्तन न ऐकताच निघावे लागले.

आक्षेपार्ह विधानांमुळे ट्रोल

काही दिवसांपूर्वी कीर्तनकार इंदुरीकर महाराज आक्षेपार्ह विधानांमुळे ट्रोल झाले होते. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी महाराजांचे अनेक जुने व्हिडिओ काढून इंदुरीकर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...