आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागणी:एल्गार प्रकरणातील कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत, केंद्राचा पर्दाफाश करा, अॅड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एल्गार परिषदेचे गुन्हा दाखल झालेले प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहिले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतेय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना सांगणे आहे की, त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आंबेडकर म्हणाले, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे याठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यातून देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल. वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser