आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची टीका:शरद पवार राज्य सरकारचे गाॅडफादर तरीही मराठा आरक्षण मिळत नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षण देण्यात मुख्यमंत्री असमर्थ : राणे

शरद पवार महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर आहेत. सरकारवर त्यांचे नियंत्रण आहे. मग मराठा आरक्षण का मिळत नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत कागदपत्रे घेऊन जाहीर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. सर्वाेच्च न्यायालयाचा ७०० पानी निकाल मी वाचला असून सरकारकडून पानापानावर किती दिरंगाई, बेफिकीरपणा झाला हे जाणवते. आेबीसींबाबत अशीच परिस्थिती असून देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण टिकवले, परंतु महाविकास आघाडी सरकारने ते घालवले. सरकारने याबाबत कायदा केला नाही, राजकीय आरक्षण कशासाठी याची कारणमीमांसा सरकारने न्यायालयासमाेर केली नाही. त्यामुळे आेबीसींचे राजकीय आरक्षण आघाडी सरकारने घालवले आहे.

बांगलादेशपेक्षा आपल्या देशात काेविड परिस्थिती गंभीर आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले हाेते. याबाबत पाटील म्हणाले, बांगलादेशची लाेकसंख्या, क्षेत्रफळ किती आणि आपली व्याप्ती किती याचा अभ्यास त्यांनी केला नाही. पहिल्या काेविड काळात सक्षमपणे पंतप्रधान माेदी यांनी प्रयत्न केले. त्यानंतर काही काळासाठी संपूर्ण देश गडबडला. कारण दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. अशा परिस्थितीतही नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर वैद्यकीय सुविधा सक्षम केल्या नसल्याचे या माध्यमातून समाेर आले.

रस्त्यावर उतरून संघर्षाची मुंडेंची शिकवण
चंद्रकांत पाटील म्हणाले, जीवनात न्याय मिळेपर्यंत सतत संघर्ष करणे हे दिवंगत नेते गाेपीनाथ मुंडे यांचे वैशिष्ट्य हाेते. विविध प्रश्नांवर संघर्ष यात्रा, माेर्चा काढत त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला आणि शासनावर दबाव टाकून समस्यांचे निराकरण केले. कार्यालयातील पक्ष त्यांनी रस्त्यावर उतरून लाेकांच्या समस्या साेडवल्या. तेव्हापासून भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करू लागला. त्यांचे वय आणि माझ्या वयात खूप अंतर असूनही बराच वेळ आम्ही एकत्रित काम केले.

मराठा आरक्षण देण्यात मुख्यमंत्री असमर्थ : राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्यांचा आरक्षणाला विरोध आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राज्यभरात फिरून आरक्षण मिळत नाही, असे सांगत त्यांनी संभाजीराजेंवरही निशाणा साधला.

राणे म्हणाले, आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका मला माहीत आहे. ते आरक्षणाच्या बाजूने नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात चांगली यंत्रणा दिली नाही. देवेंद्र फडणवीसांनी ज्या मुद्द्यांवर आरक्षण दिले होते ते मुद्दे मांडण्यात वकील कमी पडले. भाजपने याप्रकरणी पाच तज्ज्ञ वकील नेमलेले आहेत ते सरकारला मदत करतील, असा प्रस्ताव सरकारला देणार आहोत. राज्यात आरक्षण आहे, मग आमचेच आरक्षण रद्द का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले आहे. न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा उपाय राज्य सरकारच्या हातात असून त्याबाबत त्वरित याचिका न्यायालयात दाखल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने प्रयत्न करावेत
महाविकास आघाडी सरकारने बेफिकिरी दाखवल्याने सर्वोच्च न्यायालयात चांगल्या रीतीने बाजू मांडली गेली नाही. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता, वकील वेळेत न्यायालयात हजर झाले नाहीत. सरकारने खटला चालवण्यात टाळाटाळ करून तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही व त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका या सरकारने केल्या. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.

बातम्या आणखी आहेत...