आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना आढावा:'कोरोना'च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर, आरोग्यमंत्री राजेश टोपेही दौऱ्यात सहभागी

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. यासोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे.  दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी नुकताच सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यानंतर सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत. 

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी या दौऱ्याचे नियोजन केले आहे. शरद पवार रविवारी सकाळी‘गोविंद बाग’मधील निवासस्थानाहून सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही दौऱ्यात सोबत आहेत. 

सोलापुरातील अडचणी दूर करण्याचे काम शरद पवार नेहमी करत असतात. दुष्काळ असो की इतर कोणतेही संकट सोलापूरकरांच्या मदतीला शरद पवार धावून जातात. आजही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार हे सोलापुरात दाखल झाले आहेत. 

0