आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्‍सव:शारदा गजाननाच्या मनगटी 10 तोळ्यांचे कडे!

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्षभर पैसे जमवून शारदा गजाननासाठी सोन्याचे कडे तयार केले. तब्बल १० तोळे सोन्याचे हे कडे असून उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणरायाला हे कडे अर्पण करण्यात आले. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. मंडईकरांचे आराध्य दैवत असलेल्या शारदा गजाननाला विविध आभूषणांनी सजवण्यात आले आहे.

त्यामध्ये आता या सोन्याच्या कड्याची भर पडणार आहे. अखिल मंडईच्या कार्यकर्त्यांनी वर्षभरापासून जमेल तसे पैसे जमा केले. २४ कॅरेट सोन्यापासून हे कडे तयार करण्यात आले असून त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये कड्याच्या मध्यभागी सूर्य आणि ओमचे शुभचिन्ह साकारले आहे.

बातम्या आणखी आहेत...