आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर घोटाळा:अदानी समूहाच्या चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे राज्यभर आंदाेलन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहातील गैरकारभाराची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेससह काँग्रेसमधील विविध संघटनांनी राज्यभरातील एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयांसमोर आंदोलने केले. पुणे येथे युवक काँग्रेस आणि ‘एनएसयूआय’ तर्फे एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी एलआयसीच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला केले. अलका टॉकीज चौक येथील आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, मोहन जोशी, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, उल्हास पवार, दीप्ती चौधरी, कमाल व्यवहारे, गोपाळ तिवारी उपस्थित होते. गौतम अदानी हे जगातील सर्वात फसवणूकदार व्यक्ती असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी यांनी मागील आठ ते नऊ वर्षांत देशभरातील बँकांकडून मोठी कर्जे घेतली. एलआयसीला पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. २०१४ मध्ये अदानी ६१४ क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते, परंतु सध्या ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत ठरले होते. अदानी यांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात फसवणूकदार व्यक्ती आहेत हे निष्पन्न झाले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाच्या इतिहासात न भूतो न भविष्य असा भांडवली बाजारातील घोटाळा समोर आला आहे. नरेंद्र मोदी यांनी विजय माल्या, गौतम अदानी, नीरव मोदींशी जवळीक दाखवली. वित्तीय संस्थांनी उद्योगपतींना नियमबाह्य कर्जे दिली, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपने जातीधर्मांत भांडणे लावून सत्ता मिळवली
नाना पटोले म्हणाले, भाजपने अनेक रोजगाराचे आश्वासन जनतेस दिले मात्र, त्याची अद्याप पूर्तता करण्यात आली नाही. या देशात जाती धर्मात भांडणे लावून ते सत्तेवर आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेत बोलू िदले जात नाही. त्यामुळे भारत जोडो माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडत त्यांना देशात पुन्हा लोकशाही आणू असा दिलासा दिला. भाजपमुळे देश संकटात असून लोकशाही धोक्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...