आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:शीतल म्हात्रे व्हिडिओ बदनामी प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल - रुपाली चाकणकर यांची माहिती

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा बदनामीकारक एक व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे.ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी दिली आहे.

चाकणकर म्हणाल्या, राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण होत आहे.महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद होईल.शीतल म्हात्रे ह्यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे असे सूचित करण्यात आले आहे.

पुण्यात पोलिसांकडे तक्रार दाखल

शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांच्याबाबत आक्षेपार्ह मॉर्फग व्हिडिओ टाकणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्यासाठी सोमवारी शिवसेना पक्षाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.

याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांच्या बदनामीचा कट करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या फेसबुक खाते धारकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळलेल्या आरोपीवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून आयपीसी कलम 354, 471, 509, 499, 500 अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनला लेखी निवेदन पक्षाचा वतीने देण्यात आले आहे. यावेळी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे , पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...