आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Shinde MLA Tanaji Sawant Critizsize To Aditya Thackeray | Aditya Thackeray And Eknath Shinde Pune Today | Criticism Of Rebel MLA Tanaji Sawat; This Is Not A Show Of Power, But A Power

कोण आदित्य, तो फक्त एक आमदार:बंडखोर आमदार तानाजी सांवत यांची टीका; हे शक्तिप्रदर्शन नसून शक्तिपात असल्याचा टोला

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"कोण आदित्य ठाकरे, त्याचा काय संबंध, तो एक आमदार आहे. यापेक्षा मी फारसे महत्त्व देत नाही. आदित्य ठाकरे किंवा आणखी कुणी असेल, त्या गोष्टींनाही मी फारसे महत्त्व देत नाही," असे म्हणत आमदार तानाजी सावंतांनी एकेरी उल्लेख करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिंदेंच्या पुणे दौऱ्यादरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामध्ये शिंदे समर्थक आमदार तानाजी सावंत यांच्या घरी देखील एकनाथ शिंदे जाणार आहेत. तानाजी सांवत यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आदित्य ठाकरे यांची सभा होणार असून, त्यावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी आदित्य ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला.

कात्रज चौकात आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांच्या भेटीला येणार असून, त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर म्हणजेच कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची देखील संध्याकाळी सभा होणार आहे. शिवसेनेतर्फे शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. त्यावर बोलताना सावंत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा हा शक्तिप्रदर्शन नसून हा ता शक्तिपात झाला आहे. कारण, शक्ती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आली आहे. शिवसेना म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे एकही शिवसैनिक राहिलेला नाही, ठाकरे कुटुंबीयाची ही शेवटची धडपड असून, त्यामुळे आम्ही त्याला शक्तिप्रदर्शन म्हणणार नाही, असा टोला सावंतांनी लागावला आहे.

त्यामुळे शिंदे पुण्यात

एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याबाबतची अधिकची माहिती देताना ते म्हणाले की, "राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी शिंदे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन दौरा करत आहेत. तसेच अधिकाऱ्यांना भेटून तात्काळ मदत करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री करत आहेत, त्यानिमित्ताने ते आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

औकातीत राहावे

गुवाहटीत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती, त्यावर बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, "तोडफोड करणारे कार्यकर्ते हे माझ्या सेनेचे नव्हते, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भगवा गळ्यात घालून तोडफोड केली. तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडणे इतके सोपे नाही. त्या दिवशी गुवाहटीत असतानाही मी सांगितले होते की, आप-आपल्या औकातीत राहावे, आपण कुणाशी पंगा घेताय हे डोक्यात ठेवावे. आज आम्ही जरी सत्तेत असलो तरी सत्तेचा माज आम्ही चढू देणार नाही, आम्ही जनसेवा करण्यासाठी सत्तेत आहोत. ज्यांनी माझ्या कार्यालयावर दगडफेक केली, त्यांना भविष्यात त्यांची जागा कळेल.

योग्य वेळी निर्णय

पुढे सावंतांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस ठरवतील. योग्य वेळी योग्य निर्णये घेण्यात येणार असून, कोणालाही मंत्रीपद मिळणार हे लवकरच समजेल.

राऊतांवर बोलणार नाही

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यावर बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, त्यावर मी काहीही बोलणार नाही, त्यावर बोलायला आमचे प्रवक्ते आम्ही नेमलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...