आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''जीवनात अनेक वेळा अपयशानंतर ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे असे म्हणू शकतो. जिंकणे आणि हारणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हारणे सुद्धा किती महत्वाचे हे समजावून सांगणे काळाची गरजचे आहे असे विचार प्रसिद्ध लेखक व प्रेरक वक्ता शिव खेरा यांनी पुण्यात सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शिवखेरांचा पुण्यात संवाद
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ बिजनेसतर्फे आयोजित कार्यक्रमात व्यवस्थापन विभागातील 120 प्राध्यापकांना व्यवस्थापन संदर्भात शिव खेरा यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यानिमित्ताने शिव खेरा यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. तपन पांडा, स्कूल ऑफ बिजनेसचे अधिष्ठाता डॉ. दिपेन्द्र शर्मा, स्कूल ऑफ इकॉनॉमी अॅण्ड कॉमर्सच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. अंजली साने उपस्थित होत्या.
हारणेही महत्वाचेच
शिव खेरा यांनी मुलांच्या पालकांना सल्ला दिला. ते म्हणाले, हारल्यामुळे मुले डिप्रेशनमध्ये जातात. अशावेळेस सकारात्मक दृष्टीने त्यांना जिंकण्यासाठी हारणे किती महत्वाचे आहे हे आईवडिलांनी समजावून सांगावे.
शिवखेरा यांचा कानमंत्र
अंधश्रद्धाळू गोष्टी पतनाकडे नेतात
शिव खेरा म्हणाले, आजच्या काळात जाती व्यवस्था, धार्मिक थोतांड, भविष्य, मीडियाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार्या अंधश्रद्धाळू गोष्टी मानवाला पतनाकडे घेऊन जात आहे. हळूहळू आम्ही भाग्यवादी बनत आहोत हे खूप चुकीचे आहे.
शिक्षणात मुलांना समान संधी मिळावी
आजच्या शिक्षण पद्धतीवर शिव खेरा म्हणाले, भारतात एक समान शिक्षण प्रणाली असावी. त्यामुळे देशातील सर्व मुलांना एक समान संधी मिळेल. या देशातील एनआरआय व्यक्ती प्रचंड हुशार असून ते यशस्वी झाले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांची संस्कारीत अर्धांगिणी जी सुख व दुःखात त्यांच्या सोबत असते आणि त्याच जोरावर व्यक्ती यशस्वीतेची पायरी चढत असतो.
ते नेतृत्व बरे पण उत्तम नाही
शिव खेरा म्हणाले, उत्तम लिडशीपमुळे देशात परिवर्तनाची लहर आली आहे. ज्या पद्धतीचे नेतृत्व आहे ते योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत. परंतू 75 वर्षाच्या राजकारणातील वाटचाल पाहता हे नेतृत्व बरे आहे पण उत्तम नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.