आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवे म्‍हणाले:शिवसैनिक जमिनीवरच, शिवसेनेचा मुंबईत विजय निश्चित

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचा प्रत्येक सैनिक सत्तेत असो अथवा नसो नेहमी जमिनीवरच असतो. शिवसेना फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही तर आम्ही जनतेसाठी काम करतो. त्यामुळे आमचा मुंबईतला विजय निश्‍चित आहे असा आशावाद विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केला. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच अंबादास दानवे पुणे भेटीवर आले. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांना दानवे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह भेटी दिल्या. त्याचप्रमाणे शिवाजीनगर भागातील विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि गणरायाचे दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...