आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू काश्मिर खोऱ्यात पुन्हा काश्मिरी पंडीतांना लक्ष केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत. येथील बाहेरून आलेल्या नागरिकांनाही आता लक्ष्य केले जात आहे. मात्र, केंद्र सरकार या घटना थांबविण्यसाठी असमर्थ ठरले आहेत. भाजप नेते नुसते चित्रपट प्रदर्शनात व्यस्त आहेत असा आरोपही आता विरोधक करत असून सर्वसामान्य काश्मिरी जनतेला सुरक्षा देण्यास हे सरकार असर्थ आहे असे म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. पुण्यात शिवसेनेनेही काश्मिरी पंडीतांच्या मुद्यावरून आक्रमक पावित्रा घेत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गुडलक चौकात सोमवारी आंदोलन केले.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. आंदोलक यावेळी म्हणाले, केंद्रातील सत्तेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाकडून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहे. पण त्याच दरम्यान जम्मू-काश्मीर येथील पंडितांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले. त्यांना सुरक्षा देण्यात हे सरकार असमर्थ आहेत. केवळ चित्रपट काढले जातात मात्र, वस्तूस्थीतीत तेथील पंडीतांसाठी काही केले जात नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक पंडीतांचा मृत्यू झाला आहे. येथीळ नागरिकांना संरक्षण देण्यास केंद्र अपयशी ठरले आहे. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली.
आंदोलक - पोलिसांत बाचाबाची
शिवसेना आंदोलक म्हणाले, केंद्रसरकार नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी वाचळ वीरांना संरक्षण देत बसले आहे. त्यामुळे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. यावेळी आंदोलकांनी गुडलक चौकात असलेल्या कलाकार कट्याजवळ भाजपच्या नगरसेवकाच्या बोर्डाला घोषणाचे स्टिकर लावले. हे करण्यास पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने आंदोलक आणि पोलिसांत बाचाबाची झाली. यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या नंतर आंदोलकांनी लावलेले सर्व स्टिकर हटवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.