आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या परिसर आणि उत्तर प्रदेशात उत्साहाचे वातावरण:शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे आज झाशी आणि कानपूरच्या दौऱ्यावर

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात अनेक ठिकाणी उत्साह आणि उत्सुकता पाहायला मिळाली. ठिकठिकाणी भंडारा आयोजित केल्याचे दिसून आले. त्यांच्या या दौऱ्याची सर्वत्र चर्चा सुरू असल्याने संपूर्ण वातावरण भारले गेले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना दिली.

गोरे आज लखनऊवरुन कानपूर मार्गे झाशी येथे भेट देणार आहेत. झांशी येथे उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी सभापती आचार्य रघुनाथ उर्फ कक्काजी धुळेकर यांच्या परिवारास भेट देणार आहेत. आचार्य रघुनाथ धुळेंकर उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सभापती होते. त्यांच्या स्नुषा व इतिहास संशोधक डॉ.लता धुळेंकर यांनी बुंदेलखंड पन्ना राज्य व मराठ्यांचे संबंध यांच्यावर डॉक्टरेट केली आहे. त्या डॉ. गोऱ्हे यांच्या आत्या आहेत. त्यांच्याशी डॉ. नीलम गोऱ्हे स्नेह संवाद करणार असून झाशीच्या राणीचे स्मारक, वस्तू संग्रहालय आणि इतर ठिकाणी भेट देतील. कानपूर येथे काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांशी डॉ. गोऱ्हे संवाद साधणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...