आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

'व्हायरस कवच':'कोविड-19' विषाणू निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण  संशोधन केल्याचा शिवाजी विद्यापीठाचा दावा, 'व्हायरस कवच' या फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञानाची केली निर्मिती 

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

 'कोविड-19' या विषाणूचा निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण  संशोधन केल्याचा दावा शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकां कडुन करण्यात आला आहे. 'व्हायरस कवच' या फॅब्रिक स्प्रे (कपड्यांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरस सह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रिय करणे शक्य होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. अरुण कुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्य. अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी कुलगुरू डॉ.करमळकर व कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांना भेटून या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन व उत्पादनाबद्दल माहिती दिली. या तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-19 विषाणू 99.99 टक्क्यांपेक्षाही अधिक निष्क्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा.किरणकुमार शर्मा यांनी प्रा.पी.एस.पाटील आणि डॉ.किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील संशोधन केले आहे. हे तंत्रज्ञान वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे असुन,हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे.वाळल्यानंतर पुढे कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. यात केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिडची संयुगे असून ती विषारी नाहीत. तर पर्यावरणपूरक असल्याचा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सी- 'USEPA' ने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे असेही यावेळी सांगण्यात आले.