आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Shivaraya's Thoughts Are Still In The Minds Of Everyone, But The Thoughts Of Caste And Religion Continue In The Society; Sharad Pawar Expressed Grief

शिवरायांचे विचार आजही सगळ्यांच्या मनात:पण, समाजात जातीपातीचेच राजकारण सुरू; शरद पवार यांनी व्यक्त केली खंत

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शिवछत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते. त्यांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. त्यांचे विचार आजही सगळ्यांच्या मनात आहेत. मात्र, अजूनही समाजात जातीधर्माचा विचार होतो,' अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केली.

पुण्यात भूगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिवराज्यभूषण पुरस्कार सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

पवारांकडून मुश्रीफांचे कौतुक

पवार म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांना काम करण्याची जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्याचे सोनं केले आहे.हसन मुश्रीफ जिथून निवडून येतात तिथे अत्ता त्यांच्या समाजातील लोक फार कमी आहेत.त्यांच्या मतदारसंघातून बहुजन समाजाचे नेतृत्व मुश्रीफ करत आहे, केवळ त्यांचा समाजा पुरते ते मर्यादित नाही. त्यांच्याबद्दल आमचा अंदाज कधी चुकला नाही.आज हसन मुश्रीफ यांनी हजारो रुग्णांना बरे केले आहे.

सत्ता असो किंवा नसो पण त्या रुग्णांना घरी आणून त्यांनंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ही सेवा मुश्रीफ यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक योजना सुरू केल्या आहेत ज्या देशातील कुठल्याच राज्यात नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कितीही कोणी आंदोलन केले तरी पण प्रामाणिक लोकांनी काम करणाऱ्यांना लोक निवडून देतात हे दिसून येते.

सर्व पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देतील

मंत्री हसन मुश्रीफ पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्यसभा निवडणुकीचा राज्यातील आघाडीच्या सर्व जागा महविकास आघाडीचे पक्ष जिंकतील.अपक्ष आणि छोटे पक्ष असणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे मात्र, या सर्व आमदारांचे चांगले संबंध महाविकास आघाडीशी आहे.2,3 आमदार निवडणुकीत भाग घेणार नाहीत असे दिसतेय, यामुळे निवडणूक कोटा कमी होईल.

'सर्व पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देतील'

आगामी विधानसभा निवडणुकीत सगळ्या पक्षाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार द्यायचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष 2024 मध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देईलच. भाजप नेते मंडळीनी आमदार गोपीचंद पडळकर यांना आक्षेपार्ह बोलण्यापासून रोखल पाहिजे, त्यांना समज देण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...