आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट:पुण्यात कसबा पेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत समोरासमोर, मतभेद विसरून आले एकत्र

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसबा पेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आदित्य ठाकरे व चंद्रकांत पाटील.

सत्तासंघर्षावरून शिवसेना व भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत नेते मात्र मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत आहे. आज पुण्यात मानाच्या गणपतींचे दर्शन घेताना आदित्य ठाकरे व चंद्रकांत पाटील आमने-सामने आले. यावेळी मतभेद विसरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे हसून स्वागत केले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज पुण्यात आहे. अनेक मानांच्या गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. भाजप नेते चंद्रकांत पाटीलदेखील आज पुण्यात असून तेदेखील मानाच्या गणपतींचे दर्शन घेत आहेत.

दरम्यान, पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार, तेव्हाच आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटीलही तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर आदित्य ठाकरेंना यावेळी आरतीचा मानही देण्यात आला. त्यानंतर पालखी मिरवणुकीत दोन्ही नेते एकत्र सहभागी झाले.

कसबा पेठेतील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यातील मिरवणुकांबाबत नेहमी ऐकत आलो आहे. त्यामुळे आज प्रत्यक्षात पाहण्यासाठी आलो. उत्सवात ऐरवी दहा दिवस आपण गणपतीच्या दर्शनासाठी फिरत असतो. मात्र, गणेश विसर्जनावेळी मन भरून येत. तसेच, देवासमोर गेल्यानंतर मी काही मागत नाही. फक्त हात जोडून उभा राहतो. आपल्या मनात काय असत हे देवाला माहितीच असत.

बातम्या आणखी आहेत...