आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा सुचक इशारा:अजित दादा आमचं ऐका, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत; पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमात शिवसेना नेत्यांचे विधान

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आल्यास सोबत लढू नाहीतर....

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात सत्ता आपली आहे. या भागात आपलं कोणी ऐकत नाही, असं काही जण सांगतात. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री आपले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. अजित पवारांना सांगाव की, आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, असा सुचक इशारा संजय राऊतांनी दिला. संजय राऊतांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. ते आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी मार्गदर्शक मेळाव्या प्रसंगी बोलत होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी या विधानानंतर सारवासारव करायला सुरुवात केली. ते म्हणाले की, थांबा चुकीचं लिहू नका (पत्रकारांना उद्देशून). आम्हाला उद्याला दिल्लीवर राज्य करायचे असल्याने ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कोण कुठं बसतात ते पाहातायेत, तिथं आपल्याला पोहाचायचे असल्याने ते अंदाज घेत आहेत असेही राऊत म्हणाले. राज्यात आपल्याला एकत्र काम करायचे आहे, त्यामुळे आपण अजित पवारांशी बोलू, नाहीतर अवघड होईल अशी मिश्कील टीप्पणी राऊतांनी यावेळी केली.

आल्यास सोबत लढू नाहीतर....
संजय राऊत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, शिवसेनेला आता इथं कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. महानगर पालिका निवडणुकीत आपले नगरसेवक निवडून यायला हवेत. जशी राज्यात आपली सत्ता आहे, तशी इथंही सत्ता यायला हवी. आपण महापौरपदाची इच्छा व्यक्त करणं चुकीचं आहे का? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. आपल्याला एकत्र लढायचे असल्याने आले तर सोबत घेऊ नाहीतर एकटे लढू असे संजय राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...