आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरी बाणा:शिवसेनेच्या जनआक्रोश आंदोलनाचा टीझर रिलीज; आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेदांता प्रकल्पाकाच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. याच संदर्भात उद्या शनिवारी पुण्यात जनआक्रोश आंदोलन शिवसेनेच्यावतीने करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलनाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प खोके सरकारने गुजरात पाठवला, असा आरोप करत उद्या पुण्यात मावळ पंचायत समिती समोर दुपारी चार वाजता शिवसेनेकडून वेदांता प्रकल्पाबाबत जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

काय आहे टीझरमध्ये?

शिवसेनेनेकडून जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सरकारवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. ज्यामध्ये आंदोलनाची वज्रमुठ आवळून शिवसेना मैदानात उतरणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प खोके सरकारमुळे गुजरातमध्ये गेल्याने सुमारे 1 लाख तरुणांचा रोजगार गेला. महाराष्ट्रातील तरुण-तरुणाईने करायचे काय.? असा सवाल ट्रीझरमधून विचारण्यात आला आहे. प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याच्या विरोधात शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली आहे. उद्याच्या होणाऱ्या आंदोलनातून महाराष्ट्रभर सरकारविरोधात मोट बांधली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. जित के हारनेवालों को खोके सरकार कहते है अशा टॅग लाईनने आंदोलनाचे बॅनर तयार करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरेंचे सरकारवर आरोप?

वेदांताच्या अध्यक्षांवर ट्विट करण्यासाठी दबाव आणला गेला, असा आरोप बुधवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केला. तर बल्क ड्रग पार्क महाराष्ट्राच्या रायगडमध्ये येणार होता. आता बल्क ड्रग पार्कमध्ये हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये येणार आहे. पहिला प्रकल्प गुजरातच्या भरुचमध्ये येणार आहे. असाही आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राने बल्क ड्रग पार्कची मागणी पहिल्यांदा केली होती. या व्यवस्थेतील स्वत: ला घोषित करणारे मुख्यमंत्री गरागरा वेगवेगळ्या मंडळांना भेटी देत होते. उद्योगमंत्री यांना देखील हा विषय माहिती नसेल, मुख्यमंत्र्याना देखील माहिती नसेल की महाराष्ट्राचा बल्क ड्रग पार्कवर पहिला हक्क होता, तो आपल्या हातून निघून गेला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...