आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस:शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे आज 100 व्या वर्षात पदार्पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले आशीर्वाद; म्हणाले - 'जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा नवा खजाना मिळतो'

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसा निमित्त पुण्यात 20 बाय 15 फूटी रांगोळी साकारण्यात आली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस आहे. ते यावर्षी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त आज पुण्यात सेलिब्रेशन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिचिंतन करत सत्कार केला आहे.

बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसा निमित्त पुण्यात 20 बाय 15 फूटी रांगोळी साकारण्यात आली आहे. यासोबतच 99 दिवे प्रज्वलित देखील करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली तसेच मनसे परिवाराच्या वतीने चिरतरुण शिवशाहिरांना मनःपूर्वक शुभेच्छा असेही म्हटले आहे.

पायवर डोके टेकवत राज ठाकरेंनी घेतले आशीर्वाद
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांचे पायावर डोके टेकवत आशीर्वाद घेतले आहेत. राज ठाकरे यांनी सर्वात अगोदर शिवशाहीरांचा सन्मान केला. गुलाबपुष्प आणि पगडी घालून शिवशाहीरांविषयीची कृतज्ञता त्यांनी वय्क्त केली आहे. यानंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोके ठेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत.

बाळासाहेबांना भेटतो तेव्हा नवा खजाना मिळतो
राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंना भेटण्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा एक नवा खजाना मिळतो. शिव छत्रपतींविषयी नवीन माहिती मिळाली आहे. मी लहानपणापासून त्यांची व्याख्यान ऐकली आहेत. मला दर वेळी वाटते की, ते या शिवचरीत्रामधून या आजच्या दशकातही आपण कसे राहायला पाहिजे हे नेहमी सांगत असतात. शिवचरीत्र अनेकांनी लिहिली पण त्या शिवचरित्रातून समाजाने कसे सावध राहायला हवे, या गोष्टी बाबासाहेबांकडून ऐकायला मिळाले आहेत. तसेच आज एखादी घटना घडली तर ते त्याला ऐतिहासिक संदर्भ देतात. ते असं सांगताना संदर्भ जोडत नाही, तो आपण समजून घेऊन जोडून घ्यायया असतो.

बातम्या आणखी आहेत...