आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील धक्कादायक प्रकार:गुंडाचे स्वत:वरच धारदार शस्त्राने वार; पोलिस पकडायला आल्याने उचलले पाऊल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका सराईत घरफाेडी आणि वाहनचाेर गुन्हेगारास चाैकशीसाठी पकडण्यासाठी पाेलिस त्याच्या घरी गेले असता, गुंडाने घरातील सुऱ्याने स्व:ताचे अंगावर वार करुन घेत गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी जयसिंग ऊर्फ पिल्लिसिंग कालुसिंग जुनी (वय-35,रा.उरळी देवाची, पुणे) या आराेपीवर लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पाेलिस नाईक शिवाजी कुबेर जाधव (32) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार पाच अाॅक्टाेबर राेजी घडल्याची माहिती पाेलिसांनी गुरुवारी दिली आहे. जयसिंग जुनी याचे विराेधात मालाचे व शरीरा विरुध्दचे गुन्हे दाखल असून ताे पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील संशयित आराेपी आहे. पुणे शहरात त्याने आणखीन काही घरफाेडी आणि वाहनचाेरीचे गुन्हे केले आहेत अशी मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे पाेलीसांचे पथक त्याला पकडण्यासाठी उरळी देवाची परिसरातील साई मंदिर जवळील त्याच्या घरी गेले हाेते. पाेलिसांनी घराचा दरवाजा वाजवला असता त्याने त्याचे काैटुंबिक वाद व भांडणे असलेला मेव्हणा शक्तिसिंग हा मारणेसाठी आला असावा असे समजला. त्याचे हातून मरण्यापेक्षा आणप स्वत:चे जीवाचे बेरवाईट करुन घेऊन शक्तिसिंगवर कारवाई व्हावी या उद्देशाने त्याने स्वत:चे अंगावर घरातील सुऱ्याने वार करुन घेऊन स्वत:चा जीव जावा या उद्देशाने सुऱ्याने अंगावर, हाता-पायावर व पाेटावर असे ठिकठिकाणी वार करुन घेवून स्वत: गंभीर जखमी झाला आहे. पाेलिसांनी त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत पुढील तपास लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस हंबीर करत आहे.

पोलिसावर गुन्हा दाखल

लाेहगाव परिसरात राहणाऱे व्यवसायिक काळुराम दत्तात्र्य खांदवे (वय-३५) आणि त्यांचा भाऊ तुकाराम खांदवे या दाेघांना पाेलिस मुख्यालयात काम करणारा पाेलिस कर्मचारी प्रदीप रावसाहेब माेटे याने, मी पाेलिस असून तुला माहिती नाही का, बंडु खांदवे ला बाेलाव, तुमचा पंप चांगला चालताे, काेणी तुम्हास त्रास देऊ नये व आमचीही चालती राहवी यासाठी आम्हाला हफ्ता देणे वेगरे ताे काही करत नाहीये. ताे मला पाच लाख रुपये देत नाही, बघताेच तुम्हाला हफ्ता देण्याची पध्दत तुम्हाला माहिती नाही का, असे म्हणून काठी व पाईपने खंडणी मिळण्यासाठी जबर मारहाण करुन गंभीर दुखापत केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित गुन्हयाची चाैकशी पाेलिसांनी करुन आराेपी पाेलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...