आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:धक्कादायक ! पुणे जवळील भोर गावात सलग तिसऱ्या दिवशी सापडले चार मृतदेह; दोन महिला आणि दोन पुरूषांचा आहे समावेश

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील भोर गावात मागच्या तीन दिवसांपासून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सलग तिसऱ्या दिवशी भोर गावात चार मृतदेह सापडले आहे. या वाढलेल्या आत्महत्येच्या प्रकारामुळे भोर गावात खळबळ उडाली आहे. सापडलेल्या चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यामध्ये तिघांनी स्वत:हून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृतदेहांपैकी दोन मृतांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तसेच झालेल्या खरंच आत्महत्या की, हत्या असा प्रश्न पोलिस कर्मचारी आणि भोर गावात राहणाऱ्या नागरिकांना पडला आहे.

भोर गवात या ठिकाणी आढळले चारही मृतदेह:
दोन महिलांचे मृतदेह नीरा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरंगताना सापडले. तर एका पुरुषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दुसऱ्या पुरुषाचा मृतदेह पुणे-महाड मार्गावरील 200 फूट खोल दरीत सापरडला. यापैकी दोघांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर इतर दोघांची माहिती मिळवण्याचे काम पोलिस कर्मचारी करत आहेत. तसेच चार जणांमधुन तीन जणांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चार विविध घटना विविध ठिकाणी एकाच गावात झाल्याने पोलिस सुध्दा चक्रावून गेले आहेत. तसेच भोर गावात सुध्दा खळबळ उडाली आहे. या झालेल्या प्रकरणानंतर भोर गावात राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांकडे शंका व्यक्त केली आहे. मृतदेहांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पोलिस तपासाची दिशा ठरवतील. त्याप्रमाणे पुढील तपास होईल. दरम्यान दोन मृतदेहांची ओळख पटली नसून याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...