आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाब्दिक वादविवादातून खून:पुण्यातील व्यसन मुक्ती केंद्रातील धक्कादायक घटना; टॉवेलने ​​​​​​​आवळला गळा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील व्यसन मुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल असलेल्या दाेन व्यक्तीं मध्ये शाब्दिक वादविवाद झाल्यानंतर, सदर भांडणाच्या रागातून एका तरुणाने दुसऱ्या व्यक्तीचा टाॅवेलने गळा आवळून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजिंक्य सुरेश गुळमिरे (वय 35, रा. सांगाेला, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी पाेलीसांनी साैरभ गणेश सावळे (वय 20, रा. काेथरुड, पुणे) या आराेपीस अटक केले आहे. याबाबत युनिक फाऊंडेशन या व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने मयुर जयंत प्रधान (वय 40, रा.धायरी, पुणे) यांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 31 ऑगस्ट राेजी संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान युनिक फाऊंडेशन येथे घडला आहे.

का झाला वादविवाद?

तक्रारदार मयूर प्रधान यांचे धायरी परिसरात युनिक फाऊंडेशन हे व्यसन मुक्ती केंद्र आहे. सदर ठिकाणी असलेल्या व्यसन मुक्ती केंद्रात एक महिन्यापूर्वी अजिंक्य गुळमिरे हे उपचारासाठी दाखल झाले हाेते. 31 ऑगस्ट राेजी सदर केंद्रातील दुसऱ्या मजल्यावर अजिंक्य गुळमिरे व आराेपी साैरभ सावळे यांची किरकाेळ कारणावरून शाब्दिक वादविवाद झाले हाेते.

टॉवेलने आवळला गळा

वादाचा राग मनात धरून साैरभ सावळे या तरुणाने त्याचे हातातील पंचा टाॅवेल याने अजिंक्य गुळमिरे यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले. ही घटना घडल्यानंतर व्यसन मुक्ती केंद्रात गाेंधळ उडाला आणि याबाबातची माहिती सिंहगड राेड पाेलिसांना देण्यात आली.

पोलिस घटनास्थळी

पाेलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अजिंक्य गुळमिरे यास रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, परिमंडळ-3 च्या पाेलिस उपआयुक्त पाैर्णिमा गायकवाड, सहाय्यक पाेलिस आयुक्त सुनील पवार, सिंहगड राेड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक शैलैश संखे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

याप्रकरणी आराेपीस अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सिंहगड राेड पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस चंदनशिवे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...