आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा खून; पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डाेक्यात कडप्पा मारुन तिचा निघृण खून करुन पसार झाल्याची घटना साेमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी आराेपीचा शाेध घेऊन त्यास जेरबंद केल्याची माहिती मंगळवारी दिली आहे.

ललिता रमेश पुजारी (वय-30) असे खून झालेल्या माहिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती रमेश हनुमंत पुजारी (वय-35,रा.वाकड, पुणे) याला पाेलिसांनी अटक केली आहे. याबाबत वाकड पाेलिस ठाण्यात पाेलिस नाईक श्रीकांत गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी आराेपी रमेश पुजारी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रमेश पुजारी व लिलिता पुजारी हे कामाच्या निमित्ताने वाकड परिसरात रहावयास आले हाेते. परंतु काैटुंबिक वादातून त्यांच्यात सातत्याने वादविवाद हाेत हाेते. पत्नीच्या चारित्र्यावर पती संशय घेत असल्याने पतीकडून ललीता हीला मारहाणीचा प्रकार ही घडत हाेता. साेमवारी रात्री पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दाेघात वाद हाेऊन ते विकाेपाला गेले. रागाच्या भरात पतीने घराजवळ पडलेला कडप्पाचा फरशीचा तुकडा उचलून पत्नीच्या डाेक्यात जाेरात मारला. त्यामुळे पत्नी गंभीर जखमी हाेऊन रक्ताच्या थाराेळयात पडली आणि तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर आराेपी पती पसार झाला. याबाबतची माहिती वाकड पाेलीसांना मिळाल्यानंतर पाेलिसांनी आराेपीचा शाेध घेऊन त्यास जेरबंद केले आहे. मंगळवारी त्यास न्यायालयात हजर केले असता, पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास वाकड पाेलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...