आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Shooting Of A Teacher's Son By Placing A Mobile Phone In The Bathroom; Incident At Karve Nagar, Pune, Crime Filed Against Boy |marathi News

विनयभंग:शिकवणीला आलेल्या शिक्षिकेचे मुलाने बाथरूममध्ये मोबाइल ठेवून केले शूटिंग; पुण्यातील घटना, मुलाविरोधात गुन्हा दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरी शिकवणी घेण्यासाठी येणाऱ्या ५६ वर्षीय शिक्षिकेचे १६ वर्षीय मुलाने आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कर्वेनगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विधिसंघर्षग्रत मुलाविरोधात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दिली आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरातील एका सोसायटीत संबंधित ५६ वर्षीय शिक्षिका गेल्या ५ वर्षांपासून एका मुलाला इंग्रजी विषय शिकवण्यासाठी जात होती. ३ मार्च ते ३० मार्च यादरम्यान ही शिक्षिका वॉशरूममध्ये जाण्यापूर्वी संबंधित मुलाने त्याचा मोबाइल वॉशरूममध्ये ठेवून त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. यापूर्वीही त्याने शिकवणी घेत असताना शिक्षिकेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. याप्रकरणी अलंकार पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, असे प्रकार त्याने आधी केले का ? याचाही शोध घेण्यात येत आहे. या प्रकारानंतर मुलाचे पालकही चक्रावले आहेत.

सोशल मीडियातील ओळखीतून मुलीचा विनयभंग
पुण्यातील वडगावशेरी भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीची सोशल मीडियावर सौरभ (१९, पूर्ण नाव व पत्ता नाही) याच्यासोबत ओळख झाली. या मुलाने अल्पवयीन मुलीशी सतत मेसेज, फोन करून तिच्यासोबत ओळख वाढवली. त्यानंतर त्याने मुलीला विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेले. या वेळी त्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी मुलीच्या आईने आरोपी विरोधात विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...