आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:जरंडेश्वर कारखान्यात काय घोटाळा दाखवा : अजित पवार - म्हणाले, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वच साखर कारखान्यांची चाैकशी करा : भाजप

सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना ईडीने गुरुवारी जप्त केला होता. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही अंगुलिनिर्देश केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, आधी घोटाळा काय झाला आहे हे दाखवून मग आरोप करा. पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, कारखान्यावर ईडीने टाच आणली आहे ही बातमी खरी आहे. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

याआधीही सीआयडी, एसीबी, आर्थिक गुन्हे शाखने चौकशी केली, मात्र साध्य काहीच झाले नाही. चौकशी पारदर्शकपणे व्हावी. राज्य सहकारी बँकेत घोटाळा असता, तर नफ्यात आली नसती. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. कर्ज थकवणाऱ्या कारखान्यांची विक्री करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानेच दिला होता.

आधी बीव्हीजी व नंतर घाडगेंनी कारखाना चालवला : अजित पवार म्हणाले, कारखान्यासाठी १५ कंपन्यांनी टेंडर भरले होते. गुरू कमोडिटी कंपनीने सर्वाधिक ६५.७८ कोटींची बोली लावली. पहिल्या वर्षात हनुमंत गायकवाड यांच्या बीव्हीज कंपनीने कारखाना चालवायला घेतला. मात्र, कंपनीला ५ कोटींचे नुकसान झाले. त्यानंतर माझे नातेवाइक राजेंद्र घाडगे यांनी हा कारखाना चालवायला घेतला.

कारखाना फायद्यात आणला : अजित पवारांनी सांगितले की, २०१६-१७ मध्ये सर्व परवानग्या घेऊन व बँकांचे ३००-४०० कोटींचे कर्ज घेऊन कारखाना गाळप क्षमता १० हजार मेट्रिक टनपर्यंत वाढविण्यात आली. कारखाने विकत घेणाऱ्यांत काँग्रेस, भाजप नेत्यांचाही समावेश होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.

सर्वच साखर कारखान्यांची चाैकशी करा : भाजप
पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध सहकारी कारखाने ताेट्यात दाखवून विक्रीस काढायचे. लिलावात २०० ते ४०० काेटींचे कारखाने १५ काेटींत खरेदी करायचे आणि त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ३०० काेटींचे कर्ज घ्यायचे, अशी लपवाछपवी करण्याचे प्रकार घडतात. जरंडेश्वर कारखाना हे केवळ हिमनगाचे टाेक आहे. अशा प्रकारे अजून विकलेले सहकारी कारखाने ईडीच्या रडारवर येतील.

बातम्या आणखी आहेत...